Wrestlers Protest Jantar-Mantar : अखिल भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष आणि भाजपचे ब्रिजभूषण सिंग यांच्यावर प्रसिद्ध महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला आहे. ब्रिजभूषण (Brij Bhushan Sharan Singh) यांनी राजीनामा द्यावा यासाठी भारतातील नामांकित कुस्तीपटूंनी आंदोलन (Wrestlers Protest) उभारलं आहे. बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिकसारख्या मल्लांचा समावेश आहे. या आंदोलनाला देशभरातील कुस्तीपटूंनी पाठिंबा दिला आहे. अद्याप ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. अशातच कुस्तीपटूंनी मोठा निर्णय घेत कुस्ती महासंघाला मोठा धक्का दिला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) गोंडा (Gonda) इथल्या नंदिनी नगरमध्ये (Nandini Nagar) राष्ट्रीय स्पर्धेत अनेक कुस्तीपटू गेले होते. मात्र यातील अनेक खेळाडू हे कुस्ती न खेळताच माघारी परतले. हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमधील हे खेळाडू असून ते जंतक-मंतर मैदानावरील आंदोलनात सहभागी होताना दिसत आहेत. खेळाडू स्पर्धा न खेळताच परतल्याने कुस्ती महासंघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. महत्त्वाचं म्हणजे ब्रिजभूषण सिंह यांनी समोर येत अनेक खेळाडू आपल्यासोबत असल्याचं सांगितल्यावर खेळाडूंनी स्पर्धा सोडत राजधानीमधील दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर धाव घेतली आहे. 


18 जानेवारीपासून या आंदोलनाला सुरूवात झाली असून ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कुस्तीगीरांनी केली आहे. बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांच्या नेतृत्त्वाखाली कुस्ती महासंघाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आपल्या खासगी आयुष्यात कुस्ती फेडरेशन ढवळाढवळ करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आम्हाला त्रास दिला जातोय, तसेच आमचा छळ होतोय, त्याचबरोबर आम्हाला धमक्या देखील जात आहेत, असा आरोप भारतीय कुस्तीपटूंकडून केला गेला आहे. 
 
कुस्तीपटू विनेश फोगाटने केलेला आरोप-
जेव्हा आम्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळायला जायचो, त्यावेळी नियमांच्या विरोधात जाऊन ब्रिजभूषण हे खेळाडूंच्याच हॉटेलमध्ये थांबायचे. ब्रिजभूषण (brij bhushan sharan singh) महिला खेळाडूंच्या मजल्यावरच आपली रुम बूक करायचे. मुद्दामहून ते आपल्या रुमचा दरवाजा उघडाच ठेवायचे. ज्यावेळी माझा टोकिओ ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) पराभव झाला, त्यावेळी त्यांनी मला तुझं नाणं खोटं आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.